सुखकर्ता दुखहर्ता लिरिक्स - Sukhkarta Dukhharta Lyrics
गणपति आरती सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची । नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची । सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची । कंठी झळके माळ, मुक्ताफळांची ॥१॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥ रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी, कुमकुम केशरा । हिरेजडित मुकुट, शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया । जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥ लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना । सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा, वाट पाहे सदना । संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना । जय देव जय देव, जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥ घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे । प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।। त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धु: सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।। कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् । करमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।। अच्युतं केशवं राम नारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं भजे। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकीनायकं रामचंद्र भजे ।। हरे राम...